मोर, ट्विंकल खन्ना आणि जस्टिस शर्मा
 महा एमटीबी  20-Mar-2018

 
मुंबई :  प्रसिद्ध निर्माती, लेखिका आणि अभिनेता अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना हिने इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या घरी अचानक आलेल्या गोड पाहुण्यांचे म्हणजेच लांडोर आणि तिच्या पिल्लांचे फोटो पोस्ट करत एका घटनेची आठवण करून दिली आणि इंस्टाग्रामवर हशा पिकला तसच चर्चेला उधाणही आलं.
 
 
 
 
 
गेल्या काही दिवसांआधी राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी जस्टिस महेश चंद्र शर्मा यांनी 'मोर अश्रुंच्या माध्यमांतून अंडी' देतात असे विवादास्पद वक्तव्य केलं होतं. त्यावर तिने "आज आम्हाला अचानक भेटाला पाहुणे आले आहेत. सुंदर लांडोर आणि तिची पिल्लं माझ्या पिल्लांना भेटायला आली आहेत. मात्र त्यांना बघण्याच्या नादात मी त्यांना विचारायचीच विसरले की जस्टिस शर्मांनी केलेलं वक्तव्य सत्य आहे का? तुम्ही खरंच अश्रुंच्या माध्यमातून अंडी देता?"
 
 
 
 
 
तिच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 'मिसेस फनी बोन्स' म्हणजेच ट्विंकल खन्ना तिच्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहे. समाजात घडणाऱ्या गोष्टींवर तिची खुमासदार टिप्पणी नेहमीच तिच्या चाहत्यांना आणि समाज माध्यमांवरील मंडळीला वैचारिक खाद्य पुरवते हे नक्की.