इरफान खानने पोस्ट केली एक हृदयद्रावक कविता
 महा एमटीबी  20-Mar-2018
 
 
 
 
 
 
अभिनेता इरफान खान सध्या न्युरो इंडोक्राइन ट्युमर नावाच्या आजाराशी झुंज देत असतांना त्याने आज इंस्टाग्रामवर एक कविता पोस्ट केली आहे. ही कविता वाचून तुमचे मन देखील हृदयद्रावक झाल्याशिवाय राहणार नाही. ‘देव नेहमीच आपल्या सोबत असतो आणि तो कळत नकळत आपल्याशी काहीतरी बोलत असतो’.
 
 
 
 
असा आशय असणारी कविता त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. सध्या इरफान खान त्याला जडलेल्या आजाराला बरे करण्यासाठी परदेशात गेला आहे आणि तिथे त्याला या आजाराशी झुंज देतांना काय अनुभव येत आहेत याचे वर्णन तो सध्या सोशल मिडियाच्या माध्यमातून करत आहे.
 
 
 
त्याच्या सावलीचा फोटो शेअर करून त्याने ही पोस्ट टाकली आहे. या पोस्टवरून कळते की इरफान खान याच्या आयुष्यात सध्या कठीण प्रसंग ओढवला आहे. त्याच्या चाहत्यांच्या चांगल्या प्रार्थनेने तो बरा होणार असल्याने इरफान खान सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधत आहे.