नाना म्हणतायत, ''काला, कैसा नाम है रें?''

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Mar-2018
Total Views |

 
रजनीकांत आणि नाना पाटेकर हे दोन्ही कलाकार आज यशाच्या शिखरावर पोहचले आहेत. या दोघांनाही मोठ्या पडद्यावर समोरासमोर पाहणे ही रसिकप्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणीच म्हणावी लागेल. ही पर्वणी 'काला' या चित्रपटामुळे मिळणार आहे. रजनीकांत आणि नाना यांच्या प्रमुख भूमिक असणाऱ्या मूळ तेलगू चित्रपटाचा टिझर आज प्रदर्शित झालाय. या टीझरच्या सुरुवातीलाच नायकाची म्हणजेच रजनीची खिल्ली उडवत नाना एक प्रश्न विचारतोय, 'काला, कैसा नाम हैं रें?''
 
 
'काला करीकालन' असं रजनीकांत यांच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे. यातील 'काला' ही व्यक्तिरेखा रजीनीकांत यांनी रंगवली आहे. काला म्हणजे 'काळ', वाईट गोष्टींचा 'कर्दन काळ' अशी काहीशी या चित्रपटाची थीम आहे. नेहमीप्रमाणे 'काला' हा गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी, अन्यायाच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी पेटून उठलेला असणार. 'काला' टिझर मधून चित्रपटाची थोडीफार कथा लक्षात येत आहे.  हुमा कुरेशी देखील या चित्रपटातून आपल्याला दिसणार आहे.
 
 
 
असे विषय या आधीही रजनीकांत यांनी रंगवले असले तरीही यावेळी नाना आणि रजनी यांची जुगलबंदी बघण्यात वेगळीच मजा येणार आहे. नाना पाटेकर व्हिलनच्या भूमिकेत असल्याने रजनीकांत यांच्या समोर तितक्याच ताकदीचा कलाकार असल्याचे रसिकांना समाधान मिळेल. रजनीकांत यांचा जावई धनुषने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर रणजित हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. साधारणपणे येत्या दिवाळीत हा चित्रपट  तामिळ, तेलगू व हिंदीसह इतर भाषांमध्येही प्रदर्शित होईल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@