तुम्हाला कोणाचा डान्स जास्त आवडला, जॅकलिन का माधुरी?
 महा एमटीबी  19-Mar-2018

 
१९८८ साली आलेल्या 'तेजाब' या चित्रपटाने अवघ्या तरुणाईला वेड लावलच होतं पण त्या चित्रपटातील 'एक दोन तीन' हे गाणं त्यापेक्षा जास्त हिट ठरलं होतं, हे सत्य नाकारता येणार नाही. त्यावेळेसची आघाडीची अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने त्या गाण्यावर अफलातून नाच केला होता. आज तीस वर्षांनंतरही त्या गाण्याची 'मोहिनी' रसिकांच्या मनातून नाममात्रही कमी झालेली नसेल. अशातच सध्याच्या पिढीतील हॉट अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या 'जॅकलिन फर्नांडिस' हिचं याच गाण्यावर नृत्य केलेलं गाणं आज प्रदर्शित झालय.
 
 
बागी-२ चित्रपट 'एक दोन तीन' या गाण्याचा रिमेक केला गेला आहे व त्या गाण्यात माधुरीच्या जागी आपल्याला जॅकलिन दिसत आहे. नवीन गाणं श्रेया घोषालच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. पण माधुरीच्या गाण्याचा जितका प्रभाव रसिकांवर आहे तितका प्रभाव जॅकलिनचा डान्स पाडू शकणार नाही असं या गाण्यातून दिसून येतंय. मुख्य म्हणजे नवीन गाणं अवघ्या दीडच मिनिटांचं आहे. बहुदा पूर्ण गाणं चित्रपटातच आपल्याला दिसेल.
 
एकूणच जुन्या गोष्टींना कितीही मसाला लावला किंवा चकमकीत केलं तरी काही अपवाद वगळता बाकी सगळ्या गोष्टी अपयशीच ठरतात. जॅकलिनच्या गाण्यावर येणाऱ्या कमेंट बरंच काही बोलून जातात. तरीही आज हेच गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग मध्ये अग्रस्थानी आहे हे विसरून चालणार नाही. टायगर श्रॉफ व दिशा पटानी यांची प्रमुख भूमिका असणारा 'बागी-२' हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.