ही आहे, 'जिज़ा आदिनाथ कोठारे'!
 महा एमटीबी  19-Mar-2018


 
 
उर्मिला व आदिनाथ कोठारे या मराठी चित्रपट सृष्टीतील गोड जोडप्याने या वर्षीच्या सुरुवातीलाच १८ जानेवारी रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. या लहानगीच्या आगमनाने कोठारे व कानिटकर कुटुंब बेहद खुश होते. नुकताच त्यांचा हा आनंद द्विगुणित करणारा क्षण या दोन्ही कुटुंबांनी अनुभवला. उर्मिला व आदिनाथच्या मुलीचे नामकरण झाले असून 'जिज़ा' असं तिचं नाव ठेवण्यात आले आहे. जिज़ा आदिनाथ कोठारे हिच्या नामकरण सोहळ्याचे काही क्षणचित्र खास 'महा एमटीबी'च्या वाचकांसाठी...