रेड चित्रपटाबद्दल पहा या आजी काय म्हणताहेत?
 महा एमटीबी  19-Mar-2018
 
 
 
 
 
 
 
अभिनेता अजय देवगण याचा आगामी चित्रपट रेड नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात काम केलेल्या एका आज्जीने या चित्रपटाचे दमदार आणि वेगळे प्रमोशन एका व्हिडीओद्वारे केले आहे आणि हा व्हिडिओ अभिनेत्री काजोल हिने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील या आज्जीचे अप्रूप वाटल्याशिवाय राहणार नाही. पुष्पा जोशी असे या आज्जीचे नाव असून त्या जबलपूरच्या आहेत. 
 
 
 
८१ एवढे वय झाले असले तरी देखील या आज्जीने या चित्रपटात काम केले आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी एक छान संदेश तिच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचविला आहे. या व्हिडिओत त्या म्हणतात आनंदी राहा, स्वतंत्र रहा आणि दुसऱ्यांना देखील आनंदी ठेवा... असा मोलाचा संदेश देत या आज्जीने या चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. 
 
 
 
सोबतच त्या म्हणतात की, या चित्रपटाच्या छायाचित्राच्या वेळी सगळ्या चित्रपटाच्या संघाने माझी काळजी घेतली तसेच त्यांनी मला प्रोत्साहन दिले. हा चित्रपट पाहण्यासारखा आहे. तुम्ही देखील चित्रपटगृहात जावून हा चित्रपट पहा असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. तुम्ही देखील हा व्हिडिओ एकदा जरूर पहा...