इरफान खानला कुठला दुर्धर आजार झालायं?
 महा एमटीबी  16-Mar-2018
 
 
 
 
 
 
अभिनेता इरफान खान याला एक दुर्धर आजार झाला आहे अशी माहिती त्याने स्वत:हून त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली आहे. न्युरो इंडोक्राइन ट्युमर नावाचा आजार इरफानला झाला असून उपचारासाठी तो लवकरच परदेशात जाणार आहे अशी माहिती त्याने ट्वीटरवर टाकलेल्या पोस्टवर दिली आहे.
 
 
 
न्युरो इंडोक्राइन ट्युमर म्हणजे मज्जासंस्था आणि हार्मोन्स यांच्या पेशींमधून गाठ तयार होते आणि याच दुर्धर आजाराने इरफानला ग्रासलं आहे. या आजाराने मला ग्रासले आहे हे मला समजताच मला खूप मोठा धक्का बसला मात्र मी मला सावरले आणि यावर आता पुढे काय करता येईल असा विचार केला अशी माहिती या पोस्टमधून इरफान खान याने दिली आहे.
 
 
 
शरीरामधल्या हार्मोन तयार करणाऱ्या एन्डोक्राइन पेशींमध्ये ट्यूमर झाला तर त्याला एन्डोक्राइन ट्यूमर म्हणतात, आणि मज्जासंस्थेच्या पेशींशी संबंधित हा ट्यूमर असेल तर त्याला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर म्हणतात. इरफान खानला झालेला ट्यूमर हा या प्रकारातला ट्यूमर आहे. आता या आजारावर उपचार करण्यासाठी मी लवकरच परदेशात जाणार असल्याची माहिती त्याने यावेळी दिली आहे.