प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला दोन वर्षांची शिक्षा?
 महा एमटीबी  16-Mar-2018
 
 
 
 
 
 
शिक्षेनंतर लगेचच जामिन मंजूर 

पंजाब : प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदीला २००३ मध्ये मानवी तस्करी केल्याच्या गुन्ह्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा पंजाबमधील पतियाळा न्यायालयाने सुनावली आहे. सुनावणीनंतर दलेर मेहंदीला ताब्यात घेण्यात आले होते, मात्र त्यानंतर काही वेळातच त्याला जामिनही मंजूर करण्यात आला.
 
दलेर मेहंदीचा मोठा भाऊ शमशेर मेहंदी याच्या विरुद्ध २००३ मध्ये मानवी तस्करी प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. यामध्ये दलेर मेहंदी परदेशातील त्याच्या कार्यक्रमांना लोकांना आपल्या सोबत घेऊन जात असत तसेच त्याच्या भावाबरोबरच १९९८-९९ दरम्यान त्याने १० जणांना बेकायदेशीररित्या परदेशात नेले होते. 
 
 
 
म्हणूनच या प्रकरणातील संपूर्ण चौकशीअंती दलेर मेहंदीही यामध्ये दोषी आढळला होता. २००३ मध्ये झालेल्या या गुन्ह्याचा आज १४ वर्षांनी निकाल लावण्यात आला.