Race-3 : गेट, सेट गो... सलमानने लाँच केला चित्रपटाचा लोगो
 महा एमटीबी  15-Mar-2018


 
सलमान खान त्याच्या प्रत्येक चित्रपटाचे प्रमोशन नेहमीच वेगळ्या पद्धतीने करत असतो. आता त्याच्या आगामी 'रेस-३' हा चित्रपट देखील त्याला अपवाद ठरलेला नाही. आज सलमानने ट्विटरवरून रेस-३ चित्रपटाचा व्हिडिओ स्वरूपातील लोगो लाँच केला आहे. अशा प्रकारे एखाद्या चित्रपटाचा लोगो लाँच करण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी.
 
 
येऊ घातलेल्या ईदला म्हणजेच तीन महिन्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रेमो डिसुझा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून यामध्ये जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, बॉबी देओल हे कलाकार देखील असणार आहेत. नरेंद्र झा हे देखील या चित्रपटातून आपल्याला दिसणार होते परंतु कालच अचानक त्यांचे निधन झाले. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असले तर ते आपल्याला दिसतीलच पण चित्रीकरण बाकी असल्यास त्यांच्या जागी कोणता नवीन कलाकार घेतला आहे, याबाबत अजूनही कोणती घोषणा करण्यात आली नाही. विशेष म्हणजे नेहमी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या सलमानने काळ झा यांच्या निधनानंतर त्याबाबत कोणतीही पोस्ट प्रसिद्ध केली नाही, याचेच आश्चर्य वाटते.