आजपर्यंत न पाहिलेला स्वप्नीलचा रावडी 'लुक' दिसेल 'रणांगण'मध्ये!
 महा एमटीबी  15-Mar-2018


 
आपल्या चॉकलेट हिरो या प्रतिमेला बाजूला सारत स्वप्नील जोशी गेल्या काही चित्रपटांमधून वेगळे प्रयोग करताना दिसत आहे. 'भिकारी' या चित्रपटातून त्याने आईवर नितांत प्रेम असणारा मुलगा रंगवला होता. आता 'रणांगण' मधून एका वेगळ्याच धाटणीच्या 'श्लोक' या भूमिकेसह स्वप्नील रसिकांसमोर येणार आहे. या चित्रपटातील त्याचा 'लूक' देखील वेगळा असून, आज पर्यंत अशा अवतारात स्वप्नील आपण पहिले नव्हते.
 
 
राकेश सारंग यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून येत्या ११ मे रोजी प्रदर्शित होतोय. आज या चित्रपटाचे एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये स्वप्नील जोशी दिसत असून त्याचे केस खूप वाढलेले आहेत, त्याचबरोबर त्याला दाढी देखील आहे आणि एकूणच त्याला 'रावडी' लूक देण्यात आला आहे. या चित्रपटातून श्लोक आपल्याला बहुदा खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. कारण या फोटोवर टाकण्यात आलेली कंमेंट तसंच काहीस संबोधित करते.
 
 
या चित्रपटात स्वप्नीलसोबत सचिन पिळगावकरही आपल्याला दिसतील. अनेक वर्षानंतर हे दोन मोठे कलाकार सोबत काम करत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता, त्यामधल्या 'आता युद्ध अटळ आहे' या संवादावरून असं लक्षात येत की हे दोन्ही कलाकार एकमेकांच्या विरोधात या चित्रपटात उभे आहेत. चित्रपट प्रदर्शित होई पर्यंत आणखी काही गोष्टींचा उलगडा होईलच.