बाप रे बाप...राजकुमार राव दहशतवादी
 महा एमटीबी  15-Mar-2018
 
 
 

 
 
 
अभिनेता राजकुमार राव दहशतवादी बनला आहे. हे ऐकून तुम्हाला देखील धक्का बसला असेल हो न.. पण त्याचा आगामी चित्रपट ओमार्ता या चित्रपटात तो दहशतवाद्याची भूमिका केलेला दिसला आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमधील राजकुमार राव याची भूमिका पाहिली तर तुम्ही देखील अवाक व्हाल.
 
 
 
 
 
या चित्रपटात त्याने दहशतवाद्याची भूमिका चोख निभावली आहे असे ट्रेलर पाहून तुमच्या लक्षात येईलच. ओमार्ता नावाचा दहशतवादी ज्याने १९९४ मध्ये दिल्ली हल्ल्याचा कट रचला होता. अमेरिकेतील वल्ड ट्रेड सेंटरमध्ये जो हल्ला झाला यात त्याचा हात होता. या दहशतवाद्याच्या जीवनावर हा चित्रपट असून याची भूमिका राजकुमार राव साकारत आहे.
 
 
 
राजकुमार राव नेहमीच हटके भूमिकांसाठी ओळखला जातो अशीच काहीशी हटके भूमिका तो या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा साकारणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच राज याने या चित्रपटासाठी किती मेहनत घेतली असेल हे दिसून येते. या चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता असून हा चित्रपट २० एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.