औरंगाबादचे पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2018
Total Views |

आयुक्तांच्या चौकशीसाठी समितीची स्थापना

 
 
 
 
 
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादमध्ये पेटलेला कचराप्रश्न अद्यापही शांत झाला नाही. या प्रकरणी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवले, असल्याची माहिती विधानपरिषदेचे सभागृह नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
 
गुरूवारी औरंगाबदचा कचराप्रश्न विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गाजला. सत्ताधारी शिवसेनेसह विरोधकांनी हा प्रश्न उचलून धरल्यानंतर पाच ते सहा वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधकांची तातडीची बैठक घेण्यात आली. त्यात पोलिस आयुक्तांवर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. तसेच पोलिसांनी नागरिकांवर दगडफेक केली आणि निष्पाप लोकांवर विनाकारण गुन्हे दाखल केले आहेत. ते माफ करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
 
विधानपरिषदेतही कारवाईची मागणी
दरम्यान, औरंगाबादमधील कचरा प्रश्न प्रकरणी जनतेने आंदोलन केल्यानंतर पोलीसांनी कायदा हातात घेत लोकांना मारहाण केली. तरी त्यांच्यावर सरकार कारवाई करत नाही. गणवेश घालून पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले, गाड्या फोडल्या, महिला-मुलांना अमानुष मारहाण केली. पोलीसांनी केलेल्या या कृत्याचे व्हिडिओ वायरल झालेले आहेत. यावर सरकार काय कारवाई करणार यासाठी २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडून सभागृहात चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
 
चौकशीसाठी समितीची स्थापना
स्थगन प्रस्तावावर चर्चा होत नसल्याने मुंडे यांनी याप्रकरणी सरकारने निवेदन करुन ९७ अन्वये चर्चा करण्याची मागणी केली. या मागणीनंतर सभागृह नेते चंद्रकांतदादापाटील यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवले असून पोलीस आयुक्तांच्या चौकशीसाठी एसीएस होम आणि डीजी यांची समिती स्थापन करण्याची घोषणा केली.
 
@@AUTHORINFO_V1@@