सचिनच्या आमिरला 'हटके' शुभेच्छा
 महा एमटीबी  14-Mar-2018

 
मुंबई : आज बॉलिवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान याचा वाढदिवस आहे. त्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदम 'हटके' शुभेच्छा दिल्या आहेत. "आमिर तू एक सूपरस्टार आहेस आणि हे म्हणजे काही गुपित (सीक्रेट) नाही" अशा शब्दात सचिनने आमिरला शुभेच्छा दिल्या आहेत. आमिर खानच्या गाजलेल्या 'सीक्रेट सूपरस्टार' या चित्रपटामुळे सचिनने त्याला अशा आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
 
 
 
 
"तुला नेहमीच सर्वोत्तम लाभावे." अशा भावना देखील त्याने व्यक्त केल्या आहेत. आज आमिर खान याचा ५३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण सिनेसृष्टीकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
 
केवळ सिनेसृष्टीतील लोकच नाहीत तर त्याच्या चाहत्यांनी देखील त्याला वाढ दिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या आहेत. आमिर याचे अनेक आगळे वेगळे चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.