‘पद्मावत’मधील हे गाणे तुम्ही चित्रपट गृहात पाहिले नसेल
 महा एमटीबी  14-Mar-2018
 
 
 
 
 
 
पद्मावत चित्रपट जेव्हा प्रदर्शित करण्यात आला तेव्हा या चित्रपटाचा अवधी कमी करण्यासाठी या चित्रपटातील एक छान गाणे कापण्यात आले होते. आता चित्रपट प्रदर्शित होवून तब्बल दोन महिने होत असतांना काल हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘नैनोवाले ने’ असे या गाण्याचे बोल असून या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोन अतिशय मनमोहक दिसली आहे.
 
 
 
 
 
 
जेव्हा पद्मावती राजा रतन सिंग यांना बाणाने जखमी करते तेव्हा पद्मावती रतन सिंग यांना आपल्या राहत्या ठिकाणी उपचारासाठी घेवून जाते व उपचारादरम्यान राजा रतन सिंग आणि पद्मावती यांना एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होते या प्रसंगी हे गाणे चित्रित करण्यात आले होते. मात्र या चित्रपटाचा अवधी कमी करण्यासाठी हे सुंदर गाणे कापण्यात आले होते.
 
 
 
मात्र आता हे गाणे प्रदर्शित करण्यात आले असून तुम्ही एकदा तरी जरूर हे गाणे पहा...