पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांना धोका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018
Total Views |

ख्रिस्ती मानवाधिकार चळवळींनी यूएनमध्ये उपस्थित केला मुद्दा




जिनेव्हा : पाकिस्तानमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिकट असून विशेषत: पाकिस्तानात राहणारा अल्पसंख्यांक समुदाय अत्यंत भीतीदायक आणि कष्टप्रद जीवन जगत आहे, असे वक्तव्य काही ख्रिस्ती मानवाधिकार संघटनांनी केले आहे. जिनेव्हा येथे सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेच्या ३७ व्या बैठकीमध्ये त्यांनी आज मुद्दा उपस्थित केला. याच बरोबर पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायांवर होणाऱ्या हल्ल्यांचा देखील मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे काश्मीरच्या मानवाधिकारांवर सातत्यने भाष्य करणारे पाकिस्तानचा पुन्हा एकदा बुरखा फाटला गेला आहे.

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक समुदाय हा २ ते ३ टक्के इतकाच आहे. त्यामुळे तेथील कायद्याचा दुरुपयोग करून तेथील काही धर्मवेडे लोक या अल्पसंख्यांकांचा प्रचंड छळ करत आहेत. त्यामुळे पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक समुदाय हा अत्यंत भीतीदायक आणि कष्टप्रद जीवन जगत आहेत, असे त्यांनी म्हटले. याच बरोबर याठिकाणी असलेल्या अल्पसंख्यांक नागरिकांवर पाकिस्तानमधील काही लोक सातत्याने हल्ले देखील करत आहेत, परंतु पाकिस्तान सरकार याकडे कसल्याही प्रकारचे लक्ष देत नाही. यामुळे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करून पाकिस्तान अल्पसंख्यांक नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

दरम्यान गेल्याच आठवड्यामध्ये पाकिस्तानने मानवाधिकारांचा मुद्दा उपस्थित काश्मीरच्या स्वातंत्र्याची मागणी केली होती. भारत काश्मीरमध्ये सातत्याने मानवाधिकारांचे हनन करत आहे, असे आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला होता. यावर भारताने देखील त्याच भाषेत उत्तर देत आपल्या देशातील मानवाधिकारांची कधीही परवा न करणाऱ्या पाकिस्तानला काश्मीरमधील मानवाधिकारांवर ऐवढी चिंता का वाटते ? असा प्रश्न भारताने उपस्थित केला होता. तसेच काश्मीरमधील दहशतवादावरून भारताने पाकिस्तानची झाडणी करत, काश्मीरमध्ये खुरपती करणे अगोदर पाकिस्तानने थांबवावे, असे म्हटले.
@@AUTHORINFO_V1@@