सलमान आणि सोनम प्रथमच एकत्र; पुढच्या वर्षी येतोय 'झोया फॅक्टर'
 महा एमटीबी  13-Mar-2018

 
 
एखाद्या प्रसिद्ध पुस्तकावरून चित्रपट निर्माण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी चेतन भगतच्या दोन-तीन पुस्तकांवर आधारित असलेले चित्रपट प्रदर्शित झाले व त्याला लोकप्रियताही मिळाली. आता अशाच प्रकारचा एक वेगळी प्रेमकहाणी घेऊन पुढच्या वर्षी चित्रपट प्रदर्शित होतोय आणि तो म्हणजे 'झोया फॅक्टर'. विशेष म्हणजे मल्ल्याळम चित्रपटात प्रसिद्ध असणारा डलकर सलमान व सोनम कपूर प्रथमच एकत्र दिसणार आहेत.
 
 
 
अनुजा चव्हाण हिने २००८ साली लहिलेल्या 'झोया फॅक्टर' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. यामधील निखिल खोडा हे व्यक्तिमत्व सलमानने साकारले असून तो भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार आहे. तर सोनम कपूर झोया सिंग साकारत असून ती एका जाहिरात संस्थेमध्ये कार्यरत आहे. या दोघांमधील प्रेमकहाणीवर हा चित्रपट आधारित आहे.
 
 
अभिषेक शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून हा चित्रपट पुढील वर्षी ५ एप्रिलला प्रदर्शित होईल. तत्पूर्वी सलमानचे 'कारांवा' या चित्रपटातून या वर्षीच हिंदीमध्ये पदार्पण करीत आहे. या चित्रपटात इरफान खान व मिथिला पालकर त्याचे सहकलाकार असतील. तर दुसरीकडे सोनम कपूरचा 'विरे दि वेडिंग' हा चित्रपट मे महिन्यात रसिकांसमोर येणार आहे. यामध्ये करीन कपूर, स्वरभास्कर या दोन आघाडीच्या अभिनेत्री सोनम सोबत असणार आहेत.