गॅस सिलेंडर फुटले11 घरे जळून राख
 महा एमटीबी  13-Mar-2018
 
गॅस सिलेंडरचा स्फोट 
11 घरे जळून राख
जळगाव, 13 मार्च
शहरातील शिवाजी नगर भागातील भुरे मामलेदार दालफड भागात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने 11 घरे जळून राख झाली. गेल्या महिन्यात जानकिनगर येथे आग लागुन अनेक घरे जळून राख झाली होती.तशीच पुनरावृत्ती झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात होती.
 
 
भुरे मामलेदार परिसरातील दालफड भागात मोलमजुरी करणा­या नागरीकांची ओळीने 12 घरे पार्टेशनची आहेत.मंगळवारी सकाळी एका घरातील महिला घरातील देव्हा­यात दिवा लावून बाहेर गेली असता काही वेळाने अचानक घरात आग लागली. घरे पार्टेशनची असल्याने आगीने त्वरीत रौद्ररुप धारण केले. त्यातच 3 सिलेंडरचा स्फोट झाल्याने सर्व घरे आगीच्या भक्षस्थानी आली. आग लागली असल्याची माहिती मिळताच मनपाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले परंतु दोन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात आग बाबत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.
 
 
मागील महिन्यात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती
मागील महिन्यात शहरातील जानकिनगर मध्ये अशाच प्रकारे आग लागली होती. पार्टेशनची घरे शेजारी - शेजारी असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. यात अनेकंाच्या संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली होती. असाच प्रकार दालफड भागात झाला येथे सुध्दा अनेक कुटुंबांचे संसार आगीमुळे उघडयावर आले. संसारोपयोगी साहित्य जळून राख झाले.