मनरेगा : चित्ररथाला अप्पर जिल्हाधिकारी यांनी दाखविली हिरवा झेंडा
 महा एमटीबी  13-Mar-2018
 
 
 
 
 

भंडारा :  रोजगार हमी योजनेंतर्गत समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना नागरिकांना माहिती व्हावी, या उद्देशाने उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी तयार केलेल्या चित्ररथाला प्रभारी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 
 
संमृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेत स्मशानभूमी बांधकाम, ग्रामपंचायत भवन, घरकुल, नंदनवन वृक्ष लागवड, अमृतकुंड शेततळे, अहिल्यादेवी सिंचन विहिरी यासह विविध १०  योजनांचा प्रसार व प्रचार या चित्ररथाद्वारे जिल्हाभरात करण्यात येणार आहे. महात्मा गांधी नरेगानी दिलेले १०  अधिकार, भूसंजीवनी व्हर्मीकंपोस्ट, कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल शोषखड्डे,नंदनवन वृक्षलागवड, ग्रामीण सबलकरणाची संमृध्द ग्राम योजना, जाब कार्ड प्राप्त करुन घेण्याचा अधिकार, बेरोजगार भत्त्याचा अधिकार, अधिसूचित दराने मजूरी १५  दिवसात मिळण्याचा अधिकार इत्यादी योजनेचा यात समावेश आहे.