तबाल 8 तासाच्या अथक परिश्रमाणे बिबट्यास बाहेर काढण्यास यश
 महा एमटीबी  13-Mar-2018
 
मंगरूळ येथील विहरीत पडला बिबट्या
तबाल 8 तासाच्या अथक परिश्रमाणे बिबट्यास बाहेर काढण्यास यश
पारोळा
तालुक्यातील मंगरूळ  येथील शेतकरी मयराम राजाराम पाटील यांच्या मंगरूळ शिवारातील शेतातील विहरीत बिबट्या असल्याचे मयराम पाटील यांच्या निर्दशनास आल्याने त्यांनी तात्काळ तेथील पोलीस पाटील प्रल्हाद पाटील यांच्याकडे धाव घेतली.
मयराम पाटील हे नेहमी प्रमाणे आपल्या शेतात सकाळी 9 वाजेच्या सुमारास पाणी भरण्यासाठी गेले असता. मोटार सुरू करीत असताना त्यांच्या विहिरीची चाहूल लक्षात आल्याने त्यांनी कटाक्षाने विहिरीकडे बघितले तर त्यात बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले.त्यांनी विलंब न करता पो.पा. प्रल्हाद पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांनी लागलीच यंत्रणा लावली  .वनविभागातर्फे बिबट्याला बाहेर काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले गेले. वनविभागात पिंजरा नसल्याने मात्र अथक प्रयत्न करावे लागले.सीडी टाकून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी  प्रयत्न करून तबल 8 तासाच्या अथक प्रयत्नाने बिबट्यास बाहेर काढण्यास वनविभाला यश आले.
दरम्यान हजारो बघ्याची गर्दीने एकच धुमाकूळ घातला होता.विहिरीला कठडा नसल्याने आणि चहुबाजूंनी हिरवळीने विहीर नटली असल्या कारणाने बिबट्यास विहरीचा अंदाज आला नसल्याचे वर्तविले जात आहे.विहरीत बिबट्या भक्ष्याचा शोधात भटकत रानावनात फिरत असावा अशी चर्चा जन्मानसातून होत आहे.वन्य प्राण्यांना खाद्याचा शोधत वणवण भटकावे लागत आहे.
 
Tags: