शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : नामकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018
Total Views |

 
जेव्हा एखाद्याचं बारसं करायचं असतं, नाव ठेवायचं असतं तेव्हा संपूर्ण परिवार कित्ती विचार करतो नाही का? असाच हा एक अतरंगी गुजराती परिवार आहे. सुरुवातीला एक माणूस खूप घाई घाईनं टॅक्सी शोधतोय आणि त्याला काही टॅक्सी मिळेना, तिकडून फोन वर फोन कधी निघतोयेस म्हणून.. आणि तितक्यात त्याला घ्यायला येते मधुबाला.
 
ही मधुबाला म्हणजे कुणी बाई किंवा व्यक्ती नाही तर ही मधुबाला आहे त्यांची खानदानी गाडी. म्हणजे अनेक वर्षांपासून वापरात असलेली, सजलेली, मधुबाला असं जिच्यावर लिहीलंय ती मधुबाला. आणि गाडीत बसल्या बसल्या त्याची आज्जी, आजोबा, बहिणी, भाऊ त्याला नावं सुचवायला लागतात. एकूण चित्र असं स्पष्ट होतं की या माणसाला आपल्या बाळाच्या बारश्याला जायचंय, आणि त्याला ऊशीर होतोय, आणि हा अतरंगी परिवार भन्नाट नावं सुचंवतोय.
 
जेव्हा गाडी थांबते तेव्हा आपल्या परिवारामुळे त्रस्त झालेला हा माणूस त्यांना बारेच थांबायला सांगतो. प्रेक्षकांनाही धक्का बसतो, की आपल्या बाळाच्या बारश्याला हा आपल्या परिवाराला आत का नेत नाहीये? मात्र तो आत जाताच सगळं चित्र बदलतं. काय होतं असं? नेमकं 'नामकरण' कोणाचं असतं. आणि तो काय नाव ठेवतो? जाणून घेण्यासाठी नक्की बघा हा लघुपट.
 
 
 
 
 
या लघुपटाला १ लाख ५८ हजार व्ह्यूज आहेत. प्रसिद्ध कलाकार नमित दास यानी या लघुपटात मुख्य भूमिका साकारली आहे. सोनम नायरनं दिग्दर्शिक केलेला हा लघुपट प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य नक्कीच आणेल.
 
-   निहारिका पोळ  
@@AUTHORINFO_V1@@