ट्रम्प ठरले निर्दोष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018
Total Views |



वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणुकी दरम्यान रशियाची मदत घेतल्याचा लावण्यात आलेला आरोप बिनबुडाचा असल्याचे सिद्ध झाले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने गेल्या वर्षभरापासून केलेल्या चौकशीनंतर ट्रम्प यांचे रशियाशी कसलेही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः देखील या विषयी माहिती दिली असून आपल्या सोशल मिडीयावर त्यांनी याविषयी ट्वीट केले आहे. 'तब्बल १४ महिन्यांच्या चौकशी आणि शोधानंतर अमेरिकन गुप्तचर विभागाच्या हाती कसलेही पुरावे लागलेले नाहीत. तसेच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकी दरम्यान ट्रम्प यांच्या प्रचार विभागाचा आणि रशियाशी कसला ही संबंध आलेला नव्हता असे स्पष्ट झाले आहे', असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.


२०१६च्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीमध्ये रशियाने हस्तक्षेप केल्याचा आरोप अमेरिकेतील काही नागरिकांकडून करण्यात आला होता. तसेच डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी देखील ट्रम्प यांचे रशियाशी संबंध असल्याचे म्हटले होते. यानंतर या विषयी चौकशी देखील मागणी करण्यात आली होती, त्यानुसार अमेरिकन गुप्तचर विभागाने एक समिती स्थापन करून या विषयाची चौकशी सुरु केली होती.
@@AUTHORINFO_V1@@