छत्तीसगढमध्ये नक्षलवादी हल्ल्यात ९ जवान शहीद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
छत्तीसगढ : छत्तीसगडमधील किस्तरामवरून पलोदीकडे जाणाऱ्या एका गस्तपथकाला आज सुकमा जवळ नक्षलवाद्यांनी स्फोटकांचा वापर करत लक्ष्य केले. या हल्ल्यामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या २१२ बटालियनचे ९ जवान मृत्यूमुखी पडले असून ४ जखमी आणि ६ गंभीर आहेत. जखमी जवानांवर जवळच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. सध्या घटनास्थळी अतिरिक्त पथक रवाना झाले असून मिळालेल्या माहितीनुसार मदत व बचाव कार्य जोरात सुरु करण्यात आले आहे. 
 
 
 
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या हल्ल्याची तीव्र निंदा केली आहे. सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे तर त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले असून जखमी जवानांची प्रकृतीही लववकरात लवकर स्थिर व्हावी, यासाठी मी प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे. 
 
 
 
तसेच या हल्ल्यासंबंधी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांशीही संपर्क केला असून त्यांना छत्तीसगढ येथे जाण्यास सांगितले आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
 
 
 
 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना ट्विटरच्या माध्यमातून संपूर्ण भारताकडून श्रद्धांजली वाहिली. तसेच दहशतवादाच्या प्रत्येक स्वरुपाला पूर्णपणे संपवण्याचा आपला निश्चय हा कायम दृढ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
 
 
 
सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावे खालीलप्रमाणे -
 
१) एएसआय राकेएस तोमर
२) कॉन्स्टेबल अजयकुमार यादव
३) कॉन्स्टेबल मनोरंजन लंका
४) कॉन्स्टेबल जितेंद्र सिंग
५) कॉन्स्टेबल शबित शर्मा
६) कॉन्स्टेबल मनोज सिंग
७) कॉन्स्टेबल धर्मेंद्र सिंग
८) कॉन्स्टेबल चंद्रा एच एस
९) हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण
 
@@AUTHORINFO_V1@@