नरेंद्र मोदी आणि इमॅन्यूएल मैक्रॉन यांचा वाराणसी दौरा
 महा एमटीबी  12-Mar-2018
 
 
 
 
 
 
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मैक्रॉन यांनी आज उत्तर प्रदेशमधील वाराणसी शहराचा दौरा केला यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी आणि इमॅन्यूएल मैक्रॉन यांनी मिरझापूर येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले. 
 
 
 
फ्रान्सच्या मदतीने निर्माण झालेला हा देशातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प आहे. खास या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी आणि इमॅन्यूएल मैक्रॉन हे वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. अस्सी घाटापासून दशाश्वमेध घाटापर्यंत यावेळी नरेंद्र मोदी आणि इमॅन्यूएल मैक्रॉन यांनी नौका विहार केले. गंगा नदीतील घाटांचा दौरा त्यांनी यावेळी केला. 
 
 
 
 
 
यावेळी त्यांनी २३ ते २४ घाटांचा प्रवास केला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी इमॅन्यूएल मैक्रॉन यांना भारतीय संस्कृतीचे चांगले दर्शन घडवून दिले. फ्रान्सने भारताला नेहमीच अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सुरक्षा या क्षेत्रांमध्ये मदत केली आहे. त्यामुळे भारताचे पूर्वीपासूनच फ्रान्ससोबत चांगले संबंध आहे.