शेतकऱ्यांचा प्रश्न केवळ महाराष्ट्राचा नाही : राहुल गांधी
 महा एमटीबी  12-Mar-2018

 
 
नवी दिल्ली : शेतकऱ्यांचा प्रश्न केवळ एकट्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नसून संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांचा आहे, असे मत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले. मुंबईत आलेल्या शेतकरी मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
 
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला अहंकार बाजूला सारून शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घ्यावेत असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.  
 
नाशिक ते मुंबई असे जवळपास १८० किमीचे अंतर पायी चालत आझाद मैदानात आलेल्या ३० हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या मोर्च्यामुळे शेतीविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे शेतकरी आपल्या विविध मागण्या घेवून सरकारकडे चालत आहेत. त्यामुळे त्यांच्या या प्रश्नांना उत्तर मिळणार का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.
अनेक राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या मोर्चाला आपला पाठिंबा देत असून काँग्रसने देखील मोर्चाला पाठींबा दर्शवला आहे. तसेच सरकारला बळीराजाच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे.