काठमांडूच्या विमानतळाजवळ बांग्लादेश विमानाचा अपघात
 महा एमटीबी  12-Mar-2018
 
 
 
 
 
 
काठमांडू : नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळ येथे एका बांग्लादेशी विमानाचा आज अपघात झाला आहे. यू.एस. बांग्ला एअरलाईन्सचे हे विमान असून ६७ प्रवासी यामधून प्रवास करीत होते.
 
 
या अपघातामुळे त्रिभुवन विमानतळ बंद करण्यात आले असून बचावकार्यही सुरु करण्यात आले आहे. हे विमान विमातळावर पोहोचण्याआधीच हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त झालेल्या या विमानामधून आतापर्यत ८ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अजूनही मृतदेह असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 
तसेच नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानातील ३८ प्रवाश्यांचा मृत्यू झाला असून २३ जखमी झाले आहे आणि १० प्रवाशांबद्दल अद्यापही माहिती मिळू शकलेली नाही. आतापर्यंत १७ प्रवाश्यांना वाचवण्यात आले आहे. तसेच जखमी प्रवाश्यांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.