ऑक्टोबर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
 महा एमटीबी  12-Mar-2018
 
 
 
 
 
 
अभिनेता वरुण धवन आणि या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री बनिता सिंधू यांचा आगामी चित्रपट ऑक्टोबर याचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात वरून धवन डेनची भूमिका करत असून बनिता ही एका मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये काम करणारी मुलगी दाखवण्यात आली आहे.
 
 
या चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यांदा पाहिल्यावर जरा समजेनासा वाटेल मात्र ट्रेलरच्या मध्यभागात जाताच आपल्याला या चित्रपटाची कथा काय असेल याचा अंदाज येईल. या प्रेमकथेत आभासी प्रेम, केवळ एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आपले प्रेम व्यक्त करणारे युगल असे दाखवण्यात आले नसून खरे प्रेम आणि या प्रेमासाठी करण्यात आलेला संघर्ष दाखवण्यात आला आहे.
 
 
 
हॉटेलमध्ये काम करणारी मुलगी अचानक दिसेनासी होते आणि मग तिचा शोध घेत ती अचानक एका रूग्णालयात अतिशय दयनीय अवस्थेत दिसते आणि हे पासून वरून धवन काय करतो हे वर्णन सांगणारा हा चित्रपट आहे. पहिल्यांदाच वरून धवन अशी काही भूमिका साकारणार आहे. त्यामुळे या चित्रपटातील वरुण किती आवडतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.
 
 
या चित्रपटाचे दिग्दर्शन शुजीत सरकार याने केले असून चित्रपटाची कथा जुही हिने लिहिली आहे.