मला मुस्लीम म्हणून जगायचं आहे : हदिया
 महा एमटीबी  12-Mar-2018

केरळ : 'लव्ह जिहाद' प्रकरणी सध्या देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या हदिया जहा हिने आज पुन्हा एकदा आपण मुस्लीम असल्याची ग्वाही दिली आहे. 'मी माझ्या जीवनामध्ये पूर्णपणे सुखी असून मला मुस्लीम म्हणूनच जगायचं आहे' असे प्रतिपादन हदियाने आज केले आहे. केरळमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ती आज बोलत होते. यावेळी तिचा पती शफीन जहा हा देखील या ठिकाणी उपस्थित होता.

'न्यायालयाने आमच्या संबंधी गेल्या वेळी केलेल्या सुनावणीमुळे मी अत्यंत आनंदी असून सध्या मी आपल्या मनाप्रमाणे जीवन जगत आहे. सध्या मी माझ्या वैवाहिक जीवनामध्ये पूर्णपणे सुखी असून मला यापुढे देखील मुस्लीम म्हणून जगायचे आहे.' असे हदियाने म्हटले. तसेच न्यायालयाने मला माझे पुढील जीवन हे मुस्लीम म्हणूनच जगण्याची आणि माझ्या पती सोबत राहण्याची परवानगी द्यावी, असे देखील तिने या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

गेल्या जानेवारी महिन्यामध्ये न्यायालयाने हदिया प्रकरणी सुनावणी करत असताना, हदियाच्या वैवाहिक जीवनाची कसल्याही प्रकारची विशेष चौकशी केली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे हदिया आणि शफीन यांना मोठा दिलासा मिळाला होता. यावर अनेक डाव्या विचारवंतांनी देखील न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले होते. तसेच न्यायालयाने आपल्या आपल्या आदेशातून महिलांची स्वायत्त राख्ल्याची प्रतिक्रिया या विचारवंतांकडून देण्यात येत होती.