स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता पुस्तकाचे थाटात प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
औरंगाबाद :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मराठवाडा विभागाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ लिखित व भरारी प्रकाशनाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबई येथे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याहस्ते झाले. तसेच केंद्रीय मानव विकास संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुभेच्छा संदेशाद्वारे ‘अंतर्गत सुरक्षेसमोरील आव्हाने’ याविषयावरील व्याख्यान व ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याबाबत अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
 
 
शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य चंद्रशेखर ओक, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ.अरुण जोशी, कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, विश्वस्त मुकंद गोडबोले, अनुराधा खोत, सहकार्यवाह सुमेधा मराठे, माजी विक्रीकर सह आयुक्त वाल्मिक गुठे यांची विशेष उपस्थिती होती.
 
 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५२  व्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून कुलकर्णी यांनी ‘अंतर्गत सुरक्षेसमोरील आव्हाने’ या विषयावर विचार मांडले. यामध्ये त्यांनी वर्तमानातील आंतरिक सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आंतरिक सुरक्षेकडे वळणा-या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजकीय व मनोवैज्ञानिक पातळीवर सरकार आणि नागरिकांनी एकत्रितपणे व्यूहरचना आखली पाहिजे, या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न निरंतर ठेवले पाहिजेत, असे सांगितले.
 
 
पाकिस्तान, चीनकडून भारतात दहशतवादासाठी दिले जाणारे प्रोत्साहन, सागरी सीमा, आंतरदेशीय पूर्वोत्तर भारत व काश्मिरी पंडितांचे प्रश्न, धार्मिक वाद, फुटीरतावाद, जातीय तणाव, अंमली पदार्थांचा व्यापार, खोट्या चलनांचा प्रसार, हत्यारे व दारुगोळा यांची निर्मिती, गरिबी, पाणीटंचाई, आर्थिक लाभांचे अन्यायक वितरण व त्यातून निर्माण झालेला असंतोष, आरोग्य, शिक्षण, आदिवासींचे प्रश्न, आंदोलक नेत्यांची प्रक्षोभक विधाने, संगणकीय गुन्हे अशा अनेक माध्यमातून देशाच्या आंतरिक सुरक्षेपुढे आव्हाने आहेत. त्यांच्या विरोधात निरंतर प्रक्रियेतून लढा देणे गरजेचे असल्याचेही  कुलकर्णी यावेळी म्हणाले. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@