बोनी कपूर यांचे हे पत्र वाचून तुमच्या डोळ्यात देखील पाणी येईल...
 महा एमटीबी  01-Mar-2018
 
 

 
 
 
 
श्रीदेवी यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला असला तरी देखील याहीपेक्षा जास्त धक्का त्यांचे पती बोनी कपूर आणि त्यांच्या दोन मुली ख़ुशी आणि जान्हवी यांना बसला आहे. श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून एक पत्र शेअर केले आहे हे पत्र वाचल्यावर तुमच्या डोळ्यात देखील पाणी आल्या शिवाय राहणार नाही.
 
 
 
 
मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठे नुकसान सध्या झेलत आहे. श्रीदेवी ही माझी केवळ पत्नी नसून ती माझी उत्तम मैत्रीण, माझ्या मुलींची आई देखील होती. तिच्या जाण्याने आमच्या तिघांच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळले आहे. ती माझ्या आयुष्यात महत्वाची व्यक्ती होती. माझे तिच्यावर खूप प्रेम होते असे लिहित पुढे ते म्हणतात.
 
 
तिचे चाहते, मित्र, कलाकार आणि सहकारी यांचे मी मनापासून आभार मानतो यांनी आम्हाला या दुःखात खूप मोठा आधार दिला आहे. ती जगासाठी चांदणी असली तरी देखील ती माझी पत्नी होती. ख़ुशी आणि जान्हवी यांच्यामुळे तसेच अभिनेता अर्जुन कपूरमुळे या दुःखातून मी सावरू शकलो आहे.
 
 
ती एक उत्कृष्ट अभिनेत्री होती. तिच्यासारखी अभिनेत्री जगात होणे आता शक्य नाही. मला आता माझ्या मुलींची चिंता आहे. श्रीदेवी हिच्या आत्म्याला शांती मिळो आता ईश्वर चरणी हीच माझी प्रार्थना अशा शब्दांमध्ये बोनी कपूर यांनी हे पत्र लिहिले आहे.