श्रीदेवी यांच्या अंत्यविधीनंतर अमिताभ बच्चन झाले भावूक
 महा एमटीबी  01-Mar-2018
 
 
 

 
 
 
 
काल संध्याकाळी प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार झाल्यावर बॉलीवूडचे बादशहा भावूक झाले. अमिताभ बच्चन यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही भावुकता प्रकट केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून एक मनाला स्पर्श करणारा ‘शेर’ शेअर केला आहे.
 
 
 
 
"रहने को सदा देहर में आता नहीं कोई 
तुम जैसे गये ऐसे भी जाता नहीं कोई"-कैफ़ि आज़मी
 
 
वरील ‘शेर’ लिहित अमिताभ बच्चन म्हणतात की, हा ‘शेर’ प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिला असून हा ‘शेर’ त्यांनी प्रसिद्ध व दिवंगत कलाकार गुरु दत्त यांच्यासाठी लिहिला होता. मात्र आत्ताच्या परिस्थितीला हा ‘शेर’ साजेसा आहे यामुळे हा ‘शेर’ मी शेअर केला आहे असे अमिताभ बच्चन यांनी यावेळी म्हटले आहे.
 
 
 
श्रीदेवी यांच्या असे अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्यामुळे आपली भावूकता अमिताभ बच्चन यांनी या ‘शेर’ मधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यावेळी त्यांनी या ‘शेर’चा अर्थ देखील स्पष्ट केला आहे.