बेरोजगार युवकांचे प्रश्न सोडवा : संग्राम कोते पाटील
 महा एमटीबी  09-Feb-2018

 
 
सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या घोषणाबाजीमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. तरुणांना नोकऱ्या देतो अशी बतावणी सरकारने निवडणूकांपूर्वी केली होती. सरकारवर काडीचाही भरोसा युवकांना राहिलेला नाही. त्यामुळे सरकारने आधी युवकांचे प्रश्न सोडवावे अन्यथा सरकारमधील एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दिला.
 
 
सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संग्राम कोते पाटील यांनी सरकारवर सडकून टीका केली. या बाईक रॅलीला राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्यासह पक्षाचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.