वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा वाढणार : जे. पी. नड्डा
 महा एमटीबी  09-Feb-2018
 
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली: भारतातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा वाढवण्यात येणार अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी दिली आहे. आज नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकार देशात २४ नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करेल तसेच ही महाविद्यालये देशातील मागासवर्गीय भागात सुरु करण्यात येतील अशी माहिती जे.पी. नड्डा यांनी दिली आहे.
 
 
 
 
आरोग्य क्षेत्रात मानव संसाधन क्षमता वाढवण्यासाठी सरकारने आरोग्य क्षेत्रात १५ हजार कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी दिली आहे. या योजनांमुळे एमबीबीएसच्या जागा ५२ हजारांवरून ८५ हजार होणार असून पदव्युत्तर महाविद्यालयाच्या जागा ३० हजारांवरून ४६ हजार एवढ्या प्रमाणात वाढणार आहे. जिल्हा रुग्णालयांना वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये श्रेणीसुधार केले जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
 
यामार्फत गावांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. सध्या भारतात वैद्यकीय सुविधा सगळ्यांनाच उपलब्ध होवू शकत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे असे नड्डा यांनी यावेळी सांगितले आहे. देशात वैद्यकीय सेवेच्या कमतरतेमुळे देखील सरकारने हा निर्णय घेतला आहे.