आता ऋषी कपूरला ‘बीग बी’ पाठवणार वृद्धाश्रमात....?
 महा एमटीबी  09-Feb-2018
 
 

 
 
 
काय ? हे कसं काय शक्य आहे....आश्चर्य वाटलं ना वाचून... पण हे होऊ शकतं, अहो स्वतः ‘बीग बी’च असं म्हणताहेत... अहो घाबरू नका, ‘बीग बी’ असं म्हणतायत ते त्यांच्या आगामी चित्रपट ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटामध्ये..... नुकत्याच ‘बीग बीं’नी त्यांच्या ट्विटरवरून या नव्या चित्रपटाचा टिझर लाँच केला आहे. 
 
 
सर्वांचे लाडके अमिताभ बच्चन हे नेहमीच त्यांच्या चाहत्यांसमोर वेगवेगळ्या भूमिका आणि वेगवेगळे विषय सातत्याने मांडत असतात. त्याच प्रमाणे वडिल आणि मुलाच्या प्रेमळ नात्यावर भाष्य करणारा अमिताभ बच्चन यांचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप दिग्दर्शकाने गुलदस्त्यात ठेवली आहे. 
 
 
एवढंच नाही तर यामध्ये तब्बल २७ वर्षांनंतर अभिनेते ऋषी कपूर हेही अमिताभ बच्चन यांच्या सोबत दिसणार आहेत आणि तेही त्यांच्या मुलाच्या भूमिकेत.... ऋषी कपूर यांना अमिताभ यांच्या मुलाच्या भूमिकेत बघणे म्हणजे प्रेक्षकांसाठी नवीनच अनुभव असणार आहे, मात्र टिझरमधून अमिताभ ऋषी कपूर यांना वृद्धाश्रमात का पाठवणार याचा काही थांग पत्ता लागत नाही.
 
 
 
उमेश शुक्ला दिग्दर्शित सोनी पिक्चर्स रिलिझिंग ऑफ इंडिया प्रस्तूत आणि ट्रिटॉप एंटरटेन्मेंट आणि बेंचमार्क पिक्चर १०२ नॉट आऊट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे आतापर्यंत भावंड किंवा मित्र अशा भूमिका साकारणारी अमिताभ आणि ऋषी कपूर यांची जोडगोळी वडिलमुलाच्या या भूमिकेतही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.