मीसा भारतीच्या अडचणींमध्ये वाढ
 महा एमटीबी  08-Feb-2018
 
 
नवी दिल्ली :  बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी आणि भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये मीसा भारती यांच्या अडचणींमध्ये आता आणखीनच वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीच्या विशेष न्यायालयाने मीसा भारती व त्यांच्या पतीला आरोपी म्हणून संमन पाठवले आहे. तसेच न्यायालयाने त्यांना ५ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस जारी केली आहे. त्यामुळे आता लालू यांच्या नंतर कन्या मीसा भारतीला देखील शिक्षा सुनावण्यात येते का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
मीसा भारती आणि त्यांच्या पतीवर ८००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. सक्तवसूली संचालनालयाने मीसा भारती यांच्यावर कारवाई केली असून त्यांची विविध ठिकाणी असलेली संपत्ती देखील जप्त करण्यात आली आहे.
 
या आधी सक्तवसूली संचालनालयाने मीसा भारती यांचे चार्टर्ड अकाऊंटंट राजेश अग्रवाल याच्याविरोधात चार्जशीट दाखल केली होती, त्यानंतर सक्तवसूली संचालनालयातर्फे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.