‘थ्री स्टोरिज’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
 महा एमटीबी  08-Feb-2018
 
 
 
 
 
 
‘थ्री स्टोरिज’ चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली असून ती एका ५० वर्षीय म्हाताऱ्या बाईची भूमिका करतांना आपल्याला दिसत आहे. ‘हम आपके है कोन’ या चित्रपटातील रेणुका शहाणे आणि ‘थ्री स्टोरिज’ मधील रेणुका शहाणे या दोघींमधील फरक पाहून प्रेक्षक अवाक झाले तर यात काही नवल वाटण्यासारखे नाहीच.
 
 
 
तीन जोड्यांची कथा या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. अभिनेता शर्मन जोशी हा देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. समांतर चित्रपट असल्यासारखा हा ट्रेलर आहे. या ट्रेलरवरून चित्रपटात वास्तविक जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे असे दिसून येते. लाइफ इन मेट्रो, सिटी लाईट्स अशा काहीश्या चित्रपटांसारखा हा चित्रपट असेल असा अंदाज आपण या चित्रपटाचा ट्रेलर पाहून लावू शकतो. 
 
 
 
दिग्दर्शक अर्जुन मुखर्जी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून ९ मार्च २०१८ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मुंबईतील चाळीचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले असून भूतकाळ वर्तमानकाळाशी कसा जोडलेला असतो याचे दृश्य या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. मात्र रेणुका शहाणे यांच्या चाहत्यांना त्यांचा हा नवा लुक नक्कीच चकित करणारा असणार आहे.