महामस्तकाभिषेक सोहळ्याला दिमाखात सुरुवात, राष्ट्रपतींची उपस्थिती
 महा एमटीबी  07-Feb-2018
 
 
श्रवणबेलगोला (कर्नाटक) : कर्नाटक येथील जैन समाजाच्या प्रसिद्ध महामस्तकाभिषेक सोहळ्याला दिमाखात सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ८८व्या महामस्तकाभिषेक सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा १२ वर्षातून एकदा आयोजित करण्यात येतो. त्यामुळे यांदाचा महामस्तकाभिषेक सोहळा अत्यंत खास असा मानला जात आहे.
 
 
 
 
दक्षिण कर्नाटक येथील श्रवणबेलगोला या गावात दर १२ वर्षांनी हा सोहळा साजरा करण्यात येतो. यंदाच्या सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी रामनाथ कोविंद यांनी भगवान गोमतेश्वर यांचे सपत्नीक दर्शन घेतले. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात जैन समाज उपस्थित आहे. जैन समाजासाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणारा हा सोहळा ८८ वा सोहळा आहे. या आधी १२ वर्षांच्या अंतराने हा सोहळा गेली कित्येक वर्षे साजरा करण्यात येत आहे.
 
 
 
 
 

महामस्तकाभिषेक सोहळा :

महामस्तकाभिषेक सोहळा कर्नाटकातील एक प्रसिद्ध सोहळा आहे, जो दर १२ वर्षांनी साजरा करण्यात येतो. श्रवणबेलगोला या गावातील भगवान गोमतेश्वर बाहुबली यांच्यावर या सोहळ्यात अभिषेक करण्यात येतो. भगवान गोमतेश्वरांची ही मूर्ती ५७ फुट उंच आहे. ९८१ व्या शतकात या सोहळ्याला सुरुवात झाली..