रेपो दरात कुठलाही बदल नाही : उर्जित पटेल
 महा एमटीबी  07-Feb-2018

 
 
नवी दिल्ली :  रेपो दरात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही, रेपो दर ६% आणि रिझर्व रेपो दर ५.७५% असा कायम ठेवण्यात आलेला आहे, अशी माहिती भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिली. भारतीय रिझर्व बँकेचे आज त्रैमासिक पतधोरण जाहीर करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
 
 
 
 
 
या वेळी येत्या काळात महागाई वाढण्याची शक्यता उर्जित पटेल यांनी व्यक्त केली, तसेच यासाठी कारणीभूत असलेल्या ६ बाबींविषयी त्यांनी माहिती दिली. तसेच करावर लागणाऱ्या व्याजाचे दर देखील पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 
मौद्रिक धोरण समितीने येत्या काही दिवसात महागाईत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. असे गृहीत धरले जाऊ शकते की ज्या लोकांना स्वस्त कर्जांची अपेक्षा आहे त्यांना प्रतीक्षा करावी लागेल, असे देखील यावेळी सांगण्यात आले आहे.
 
या दरम्यान, जीडीपी सुधारणा झाली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. एमपीसीच्या मते, या वर्षी जीडीपीमध्ये ६.६% ची वाढ होणे अपेक्षित आहे. जे पूर्वी ६.७% होते. तसेच, गुंतवणुकीच्या कामकाजात सुधारणा झाल्याचे संकेत आहेत, असेही त्यांनी सांगितले.