‘परी’ चित्रपटाचा भयावह टीझर प्रदर्शित
 महा एमटीबी  07-Feb-2018
 
 
 
 
 
 
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा आगामी चित्रपट ‘परी’चा नुकताच टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने स्वत:ने या चित्रपटाचा टीझर त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरून आपल्यापर्यंत पोहोचविला आहे. टीझरमध्ये अनुष्का शर्मा अतिशय भयावह दाखवण्यात आली असून ती भुताच्या वेशात दाखवण्यात आली आहे. विराट कोहलीने पहिल्यांदाच अनुष्काने काम केलेल्या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.
 
 
 
अनुष्का शर्माला अशा अवस्थेत पाहतांना सगळ्यांनाच भीती वाटणार आहे. या टीझरमध्ये अनुष्काला भूत दाखवण्यात आले असून तिच्या शरीरात भुताचा प्रवेश होतो आणि ती सगळ्यांना त्रास देते असे या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. हॉलीवूडमध्ये जसे भुताचे चित्रपट असतात त्या प्रकारचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. काही प्रमाणात हॉलीवूड सारखी झलक या टीझरमध्ये दिसते.
 
 
 
२ मार्च २०१८ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून अनुष्काचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. कारण अशा पद्धतीचे काम अनुष्का पहिल्यांदाच करतांना दिसणार आहे.