अनुपम खेर यांचे ट्वीटर अकाऊंट ‘हॅक’
 महा एमटीबी  06-Feb-2018
 
 
 
 
 
 
 
मुंबई: प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचे ट्वीटर अकाऊंट नुकतेच ‘हॅक’ झाले असल्याची माहिती खुद्द अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. अनुपम खैर हे सध्या विदेशात आहेत. त्यामुळे त्यांना या बाबत माहिती नव्हती मात्र त्यांच्या भारतातील मित्रांनी त्यांना ही माहिती दिली असल्याचे त्यांनी या संदेशात म्हटले आहे.
 
 
 

 
 
 
अनुपम खेर हे सध्या अमेरिकेतील लॉस एंजलीसमध्ये आहे. त्यांनी याबाबत ट्वीटर माहिती दिली असून यावर लवकर पाऊल उचललेले जाईल असे त्यांनी म्हटले आहे. तुर्कस्तान येथील ‘हॅकर्स’ नी हे ट्वीटर अकाऊंट ‘हॅक’ केले असल्याचे म्हटले जात असून या ‘हॅकर्स’ नी ‘आय लव पाकिस्तान’ असे संदेश त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर केले आहेत.
 
 
 
अनुपम खेर हे ट्वीटरवर नेहमीच कार्यरत असतात. मात्र आता सध्या ते परदेशात गेले असल्याने त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हती अशी माहिती अनुपम  खेर यांनी दिली आहे.