नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘जागतिक गुंतवणूकदार परिषदे’चे उद्घाटन
 महा एमटीबी  03-Feb-2018
 
 
 
 
 
गुवाहाटी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आहे. आज आसाममधील गुवाहाटी येथे या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले दोन दिवसीय चालणाऱ्या या परिषदेत जगभरातील गुंतवणूकदार आणि उद्योजक भाग घेणार आहेत. भारतात गुंतवणूकदार वर्ग वाढवा तसेच भारतातील उत्पादन बाहेरच्या देशात विकले जावे असा या परिषदेचा उद्देश आहे.
 
 
 
 
 
 
 
 
जपान, जर्मनी आणि इतर बरेच देश या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहे. उत्तर पूर्व क्षेत्रातील राज्यांचा आर्थिक विकास व्हावा तसेच उत्तर पूर्वेकडील राज्यांचा सहभाग भारतीय अर्थव्यवस्थेत वाढवा या उद्देशाने इतक्या मोठ्या प्रमाणात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी भारताचे मोठे उद्योजक मुकेश अंबानी, भूतानचे पंतप्रधान शेरींग टोबगे, पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण आणि प्रमुख राजकीय मंडळी उपस्थित आहेत.