श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज होणार अत्यसंस्कार
 महा एमटीबी  28-Feb-2018
 
 
 
 
 
 
हवाहवाई आज अनंतात विलीन होणार...
 
 
मुंबई : बॉलीवूडची पहिली प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज मुंबईमधील विलेपार्ले येथील सेवा समाज स्मशानभूमीत अत्यसंस्कार होणार आहे. दुपारी ३.३० च्या सुमारास श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार केले जाणार आहेत. काल रात्री १०.३० च्या सुमारास श्रीदेवी यांचे पार्थिव त्यांच्या मुंबईमधील राहत्या घरी अर्थात ग्रीन एकर्समध्ये आणण्यात आले. 
 
 
 
काल रात्रीपासूनच सिनेकलाकारांनी श्रीदेवी यांचे अंतिम दर्शन घेण्यास सुरुवात केली होती. अभिनेता सलमान खान आणि अभिनेता शाहरुख खान या दोघांनी काल श्रीदेवी यांचे अंतिम दर्शन घेतले. आज सकाळी ९.३० ते १२.०० वाजेच्या सुमारास श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईमधील सेलीब्रेशन क्लब गार्डन येथे अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. यावेळी सामान्य जनता त्यांना शेवटचे पाहू शकणार आहेत. 
 
 
 
त्यानंतर दुपारी २ वाजता श्रीदेवी यांच्या अंतिम यात्रेला सुरुवात होणार आहे. विलेपार्ले येथील सेवा समाज स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार केले जाणार आहे. काल रात्री श्रीदेवी यांच्या पार्थिवाला दुबई येथून मुंबईत आणण्यात आले यावेळी श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर आणि सावत्र मुलगा व अभिनेता अर्जुन कपूर उपस्थित होते. 
 
 
 
श्रीदेवी यांच्या संपूर्ण शरीराला लेप लावण्यात आला असून त्यांच्या पार्थिवाला अतिशय कडक सुरक्षा व्यवस्थेत मुंबईत आणण्यात आले आहे. लाखो प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री श्रीदेवी २५ फेब्रुवारीला काळाच्या पडद्याआड गेली. एका घरगुती लग्न समारंभासाठी त्या दुबईमध्ये गेल्या होत्या या दरम्यान रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली होती.