श्रीदेवी यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
 महा एमटीबी  28-Feb-2018
 
 
 
 
 
 
मुंबई : बॉलीवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला आहे. श्रीदेवी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले असल्याने त्यांना आज भारत सरकारकडून राजकीय सन्मानात अखेरचा निरोप देण्यात आला आहे.
 
 
 

 
 
सध्या सुरु असलेल्या अंतिम यात्रेमध्ये श्रीदेवी यांचे पार्थिव तिरंग्यात ठेवण्यात आले आहे. संपूर्ण राजकीय सन्मानासहित श्रीदेवी यांना अंतिम निरोप देण्यात आला आहे. संपूर्ण सिनेसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री यांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. त्यांच्या अखेरच्या यात्रेला त्यांच्या चाहत्यांची गर्दी देखील सध्या पाहायला मिळत आहे.
 
 
 
काही क्षणातच श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येईल. यावेळी त्यांचे पती बोनी कपूर, त्यांच्या दोन्ही मुली, सावत्र पुत्र अर्जुन कपूर, अभिनेता अनिल कपूर आणि संपूर्ण कपूर कुटुंब उपस्थित आहे.