आज राष्ट्रीय विज्ञान दिवस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
विज्ञानापासून होणारे लाभ आणी या लाभांचा उपयोग समाजाला समजावा तसेच त्यांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस आज अर्थात २८ फेब्रुवारीला साजरा केला जातो. भारतात विज्ञानाला चालना मिळावी तसेच भारतीय विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे वाटचाल करावी या उद्देशाने हा दिवस २८ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
 
 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवरून विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देत भारतीय वैज्ञानिकांचे कौतुक केले आहे. तसेच भावी वैज्ञानिकांना शुभेच्छा देत विज्ञानामध्ये नवीन नवीन प्रयोग करत रहा असा तरुणांना सल्ला दिला आहे. आज विज्ञानाकडे वळणे गरजेचे असल्याने प्रत्येक भारतीयांना याचा प्रयोग आपल्या दैनंदिन जीवनात करायला हवा असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मन की बातमध्ये  देखील नरेंद्र मोदी यांनी विज्ञानाकडे वळा आणि त्याचा वापर करा असा सल्ला दिला आहे.
 
 
 
२८ फेब्रुवारी १९२८ मध्ये रमण प्रभावाचा शोध प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनी लावला होता. म्हणून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस मानला जातो. रमण यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे झाला असून त्यांचे शिक्षण चेन्नई येथे झाला. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रमण हे काही काळ बंगळूर येथे होते, १९४७ साली ते रमण संशोधन संस्थेचे संचालक झाले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@