अरे बाप रे...अनुष्काचे डोळे पाहिले काय?
 महा एमटीबी  27-Feb-2018
 
 
 
 
 
 
 
दिवसेंदिवस अभिनेत्री अनुष्का शर्मा विद्रूप होत चालली आहे याची तुम्हाला कल्पना आहे काय? मात्र, यात काही घाबरण्याचे कारण नाही. तिचा आगामी चित्रपट ‘परी’चा नवा टीझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अनुष्का शर्मा अतिशय विद्रूप दिसत आहे. या नव्या टीझरमध्ये अनुष्काचे डोळे अतिशय भयावह दाखवण्यात आले आहे.
 
 
 
एका शव ठेवण्याच्या खोलीमध्ये ती शव पेटी तोडण्याचा प्रयत्न करते आणि ही पेटी उघडताच अनुष्काचा तो भयावह चेहरा दिसताच अंगावर काटा येतो. या टीझरमध्ये ती शव पेटीवर बसलेली दाखवण्यात आली आहे. ज्याप्रमाणे तिचा चेहरा दाखवण्यात आला आहे. त्यानुसार तर सगळेच प्रेक्षक घाबरणार असे या टीझरवरून दिसत आहे.
 
 
हा चित्रपट २ मार्चला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये बरीच पाहायला मिळत आहे. कारण अनुष्का शर्मा हिने पहिल्यांदाच असा काहीसा अभिनय केला आहे. त्यामुळे तिला भुताच्या वेशात पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.