श्रीदेवींचे पार्थिव भारतात आणण्यास दुबई पोलिसांची परवानगी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
दुबई : अखेर दुबई पोलिसांनी प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आज रात्री ९ पर्यंत श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यात येईल अशी बातमी सध्या पुढे येत आहे. दुबई पोलिसांनी भारतीय दूतावासाला पत्र पाठविले असून या पत्रात श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात नेण्यास आता काहीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
 
 
लाखो प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री श्रीदेवी २५ फेब्रुवारीला काळाच्या पडद्याआड गेली. एका घरगुती लग्न समारंभासाठी त्या दुबईमध्ये गेल्या होत्या या दरम्यान रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सुरुवातीला हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली होती, त्यानंतर कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचा मृत्युं झाल्याचे पुढे आले. मात्र शवविच्छेदानानंतर आलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे की, त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाला नसून बाथटबमध्ये बुडून झाला आहे.
 
 
फॉरेन्सिक चाचणीदरम्यान त्यांच्या शरीरात मद्य आढळून आल्याची माहिती मिळाली. दुबई येथे आपल्या पुतण्याच्या लग्नात गेलेल्या श्रीदेवी, कार्यक्रमानंतर हॉटेलमध्ये परतल्या, मद्यपान केल्यामुळे बाथरूममध्ये तोल गेला आणि बाथटबमध्ये असलेल्या पाण्यात जीव गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.
 
 
 
त्यांच्या मृत्यु दुबईमध्ये झाल्यामुळे तिथल्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतरच त्यांचे पार्थिव परिवाराकडे सोपावण्यात येणार होते, मात्र शेवटी आता दुबई पोलिसांकडून त्यांचे पार्थिव भारतात नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@