प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ “अधिराज्य” गाजवणारी अभिनेत्री हरपली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2018
Total Views |
 
 
 
 


एक चांदणी अकाली निखळली-सुधीर मुनगंटीवार
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने सहज सुंदर अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रीला आज प्रेक्षक मुकले असून चित्रांगणाच्या नभातून एक सुंदर चांदणी अचानक निखळली असल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
 
 
 
सतत काही तरी नवं करण्याची ओढ, डोळ्यांमधील अवखळपणा आणि अभिनयातील सहजता यामुळे प्रत्येक भूमिका जिवंत करणाऱ्या श्रीदेवी यांनी तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, हिंदी अशा अनेक भाषांमधून चित्रपट केले. 'सदमा' मधील त्यांचा अभिनय आज ही आपल्याला नि:शब्द करतो. चांदणी, नगिना, मि. इंडिया, लम्हे, खुदागवाह अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. अलिकडच्या काळातील इंग्लिशविंग्लिश मधील त्यांची गृहिणीची भूमिका मनाला खूप स्पर्शून गेली. एका गृहिणीच्या मनातील घालमेल, तिची अस्तित्वाची लढाई सर्वांना भावली. 'मॉम' मधून आई- मुलीच्या नात्याची एक सुंदर गुंफण त्यांनी विणली. त्यांच्या या अभिनय कारकीर्दीचा गौरव म्हणून त्यांना २०१३ साली पद्मश्री देऊन गौरविण्यात आले होते. गंभीर भूमिकांप्रमाणेच प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची किमया त्यांच्या अभिनयात होती. एक माणूस म्हणूनही त्या सदैव स्मरणात राहतील.
 
 
त्यांचे असे अकाली जाणे हे सर्व चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो असेही सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@