श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयविकाराने नव्हे, बाथटबमध्ये बुडून झाला
 महा एमटीबी  26-Feb-2018

 
दिवंगत सिने अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूची घटना अनेक चाहत्यांना चटका लावून गेली. सुरुवातीला हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती आली, त्यानंतर कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचा मृत्युं झाल्याचे समोर आले. मात्र शवविच्छेदानानंतर आलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे की, त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाला नसून बाथटबमध्ये बुडून झाला आहे.
 
 
फॉरेन्सिक चाचणीदरम्यान त्यांच्या शरीरात मद्य आढळून आल्याची माहिती पुढे आली आहे. दुबई येथे आपल्या पुतण्याच्या लग्नात गेलेल्या श्रीदेवी, कार्यक्रमानंतर हॉटेलमध्ये परतल्या, मद्यपान केल्यामुळे बाथरूममध्ये तोल गेला, आणि बाथटबमध्ये असलेल्या पाण्यात जीव गुदमरून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.
 
 
त्यांच्या दुबईमध्ये मृत्यु झाल्यामुळे तिथल्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतरच त्यांचे पार्थिव परिवाराकडे सोपावण्यात येणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळी उशिरा त्यांचे पार्थिव मुंबई येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील अशी शक्यता आहे.