भारताकडून 'धनुष' बैलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
 महा एमटीबी  24-Feb-2018
 
 
 
 
 
ओडिसा : भारताच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी ओडिशाच्या किनारपट्टीवर नौदलाच्या जहाजातून ३५० किलोमीटरच्या हेलिकॉप्टरसह अणु-सक्षम 'धनुश' या बैलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
 
 
भारतीय बनावटीचे आणि पृथ्वी क्षेपणास्त्राच्या नौदल प्रकारात मोडणारे हे धनुष क्षेपणास्त्र सकाळी १०.५२ मिनिटांनी बंगालच्या उपसागरातील पारादीप जवळील जहाजातून परीक्षण करण्यात आले.  तसेच धनुष हे क्षेपणास्त्र ५०० किलोग्रॅम पर्यंतचे वजन उचलून जमिन आणि समुद्र या दोन्ही लक्षांवर मात करण्यास सक्षम आहे.  संरक्षण दलाच्या स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड (एसएफसी) यांच्याकडून त्याचे परीक्षणही करण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी ही त्यांच्या प्रशिक्षण अभ्यासातील एक टप्पा आहे.
 
 
ही चाचणी म्हणजे पूर्ण यश आहे, या चाचणीदरम्यान अपेक्षित सर्व उद्दीष्ट यामध्ये घेतली गेली. ओडिसाच्या किनारपट्टीवरील डीआरडीओ टेलीमेट्री आणि रडारच्या साह्याने धनुश क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण आणि त्याचे निरिक्षण करण्यात आले होते.
 
 
एकल स्तरीय आणि द्रवप्रवाहित 'धनुश', आधीच संरक्षण सेवांमध्ये समाविष्ट केले गेले आहे. इंटिग्रेटेड गाईड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्राम (आयजीएमडीपी) अंतर्गत डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑरगनायझेशन (डीआरडीओ) यांनी विकसित केलेल्या पाच क्षेपणास्त्रांपैकी धनुष क्षेपणास्त्र एक आहे. याची अंतिम चाचणी ९ एप्रिल २०१५ रोजी यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली आहे.
 
२० फेब्रुवारी रोजी ओडिशा किनारपट्टीवरील अब्दुल कलाम बेटावरून डीआरडीओने अग्नी- २ या क्षेपणास्त्राचीही यशस्वी चाचणी केली होती. २ हजार किमी एवढी अग्नी २ या अणु क्षेपणास्त्राची मारा कारण्याची क्षमता असून अग्नी-२ हे क्षेपणास्त्रदेखील भारतीय लष्करात यापूर्वीच दाखल केले गेले आहे.