अफगाणी मुलांबरोबरचा अक्षयचा 'हा' फोटो होतोय व्हायरल!
 महा एमटीबी  22-Feb-2018

 
'पॅडमॅन' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अक्षय कुमार प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचला आहे. दरम्यान त्याच्या आगामी 'गोल्ड' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला व प्रेक्षकांना तो खूपच आवडला. आता अक्षयच्या प्रसिद्धीमध्ये आणखी भर पडत आहे ती आज त्याने पोस्ट केलेल्या फोटोमुळे. 'केसरी' या अक्षयच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी काढलेला हा फोटो आहे.
 
 
 
या फोटोत तीन अफगाणी मुलं दिसत असून त्या तिघांच्या चेहऱ्यावर निरागस हास्य दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना अक्षयने लिहिलंय की, ''आज चित्रीकरणादरम्यान काढलेल्या या फोटोत मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य दिसत आहे. सारागढ़ी युद्धावर आधारित असणाऱ्या केसरी या चित्रपटाच्या चित्रीकरणात या प्रेमळ अफगाणी मुलांबरोबर चित्रीकरण करताना मजा आली.''
 
 
 
केसरी चित्रपटाचा निर्माता या नात्याने कारण जोहरणेही अक्षय कुमारचे ट्विट रिट्विट करत त्याला प्रतिक्रिया दिली आहे.  
 
सारागढ़ी युद्धावर आधारित आणखी दोन चित्रपट व एक मालिका प्रदर्शित होणार असल्याचे याआधी जाहीर करण्यात आले आहे. अजय देवगण (सन्स ऑफ सरदार) आणि रणदीप हुडा हे चित्रपट तर मोहित रैना याच विषयावरील मालिका करत आहेत. आता नक्की होणार चित्रपट प्रदर्शित होणार याबद्दल आताच सांगता येणे अवघड आहे.  
 
असे झाले होते सारागढ़ीचे युद्ध
१२ सप्टेंबर १८९७ मध्ये ब्रिटिश इंडियन आर्मी आणि अफगाणी सैन्य यांच्यात सारागढ़ी युद्ध लढले गेले. हे युद्ध पाकिस्तानात असलेल्या खैबर-पख्तुनख्वा येथे घडले. ब्रिटिश भारतीय लष्कराला शीख कर्णधार चौथ्या बटालियनचे २१ शीख, १० हजार हल्ला केला होता अफगाण सैन्याने. बटालियनचे नेतृत्त्व करणारा, हवलदार ईश्वर सिंग यांनी अशा मरणाच्या मृत्यूसाठी लढा देण्याचा निर्णय घेतला. हे लष्करी इतिहासातील इतिहासातील लढायातील सर्वात मोठे अंत आहे. ब्रिटीश भारतीय सैनिक आणि अफगाणी सैनिकांच्या दरम्यान दोन दिवसांच्या लढाईनंतर, इतर भारतीय सैन्य परत त्या जागेवर परत आले. या युद्धाच्या स्मरणशैलीत १२ सप्टेंबरला शीख सैन्य जवान 'सारागढ़ी दिवस' म्हणून साजरा करतात.