प्रभू देवाला नृत्यामध्ये ही कोण मुलगी टक्कर देतेये...
 महा एमटीबी  22-Feb-2018
 
 
 
 
 
 
सुप्रसिद्ध अभिनेता आणि डान्सर प्रभू देवाला ही कोण मुलगी आहे जी ‘डान्स’मध्ये टक्कर देत आहे असा प्रश्न तुम्हाला सध्या पडला असेलच? मात्र ही मुलगी आणि प्रभू देवा लवकरच एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे येणार आहे. ‘लक्ष्मी’ असे या चित्रपटाचे नाव असून आज या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 
 
 
 
 
 
 
या टीझरमध्ये ही छोटी मुलगी अक्षरशः प्रभू देवाला ‘डान्स’मध्ये टक्कर देतांना दिसली आहे. हा चित्रपट तमिळ आणि तेलगुमध्ये असून प्रभू देवा आणि लक्ष्मी यांच्या डान्सची जुगलबंदी या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे असे टीझरवरून दिसत आहे. प्रभू देवा यांनी स्वत:च्या ट्वीटर अकाऊंटवरून हा टीझर शेअर केला आहे.
 
 
हा चित्रपट ‘डान्स’ या विषयावर असून यात प्रभू देवा आणि या नव्या मुलीने धम्माल केली असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय हे असून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची तारीख सध्या दिग्दर्शकाने गुलदस्त्यातच ठेवली आहे. मात्र प्रभू देवा यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट अतिशय उत्सुकतेच ठरणार आहे.